🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडचा आघाडीचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता पुन्हा एकदा हटके स्टोरी घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो सोशल मिडियावर देखील सक्रीय असतो. या नवीन चित्रपटाबाबत त्याने सोशल मिडियावर माहिती दिली आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ असे करण जोहरच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची नुकतीच त्याने घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आलिया भट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CQ-VGu5JigW/?utm_source=ig_web_copy_link
करण जोहर दिग्दर्शित, हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता द्वारा निर्मित , या चित्रपटाचा स्टुडिओ पार्टनर व्हायकॉम १८ आहे. या चित्रपटाचे संवाद इशिता मोइत्रा यांचे असून , कथा इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेली आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
करणचे ‘शेर शाह’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘लाइगर’, ‘दोस्ताना २ ‘ असे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. अलीकडेच करण जोहरने ‘अनामिका’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वरार’, ‘फॅब्युलस लाइव्ह्ज बॉलिवूड बायका २ ‘ सारख्या वेब सीरिजचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आता करणचे नवीन चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सर्व केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?’, फडणवीसांचा हल्लाबोल
- ‘माझ्यावर आरोप म्हणजे राज्य सरकारवर आरोप, मला क्लीनचिट द्या’; सरनाईकांची मागणी
- ‘चिंधीचोर भास्कर जाधव स्वतःच्या घरात बाहेरून कडी लावून झोपतो, त्याला मुंगीही मारणार नाही’
- ‘अभिरूप विधानसभा भरवणाऱ्या भाजप सदस्यांवर कारवाई करा’, जयंत पाटलांची मागणी
- भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीचं ‘या’ खेळाडूचं निलंबन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
