🕒 1 min read
मुंबई: राज्याचे २०२२ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिक यांचा राजीनामा तसेच ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून चांगलेच गाजत आहे. काल (४ मार्च) सलग दुसऱ्या दिवशीही भाजपने ओबीसी आरक्षण संदर्भात मविआ सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली. आता याच मुद्द्यावर भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“मविआ सरकारला ओबीसीचे आरक्षण द्यायचंच नाही. मराठा आरक्षण टिकवल नाही, विकासांचे कोणतेच धोरण सरकार कडे नाही. जनतेचे राज्य नाही.त्यामुळे खंडणी, वाजे, नबाब मलिक हीच या सरकारची ओळख आहे.”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
#मविआ सरकारला ओबीसीचे आरक्षण द्यायचंच नाही
मराठा आरक्षण टिकवल नाही
विकासांचे कोणतेच धोरण सरकार कडे नाही.
जनतेचे राज्य नाही तर
खंडणी, वाजे, नबाब मलिक ही या सरकारची ओळख आहे— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 5, 2022
दरम्यान कालच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर ठाकरे सरकार या संदर्भात नवीन कायदा करणार असल्याचे म्हटले आहे. तर भाजपने आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“राज्यपालांच्या खांद्यावर फडणवीसांची बंदूक”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
-
“सत्ता गेली याचा इतका राग…”, संजय राऊतांचा भाजपला जोरदार टोला
-
Shane Warne Death: “खूपच लवकर गेलास मित्रा…” शेन वॉर्नच्या जाण्यावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले दुःख
-
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये गोळीबारीत जखमी झालेल्या हरजोत सिंगबाबत भारत सरकारचा महत्वाचा निर्णय
- हे भाजपचं ‘सिलेक्टिव्ह’ राजकारण; आरक्षणावरुन रोहित पवारांचा विरोधकांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
