मुंबई : कोरोनाची झळ सगळ्याचं क्षेत्रांना बसली आहे. क्रिकेटचे आतंरराष्ट्रीय सामने जरी सुरू झाले असले तरी डोमेस्टिक क्रिकेट दोन वर्षे बंद पडले होते. मात्र बीसीसीआयने या वर्षी लांबनीवर पडलेली रणजी ट्रॉफीचे नियोजन दोन टप्प्यात करण्याचा बेत आखला आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात १३ जानेवारी पासून होणार होती. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक लक्षात घेता खेळाडूंच्या आरोग्यासाठी या स्पर्धेला अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता बीसीसीआयनेही स्पर्धा दोन टप्प्यात खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चपासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. आयपीएलचे यंदाचे सामने भारतातच व्हावे यासाठी बीसीसीयकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफी एका टप्प्यात होणे शक्य नसल्याचे सांगितले गेले आहे. पहिला टप्पा फेब्रुवारीत तर दुसरा टप्पा आयपीएलनंतर घेण्याचे नियोजन सुरु आहे.
३४ फर्स्ट क्लास संघांमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे या स्पर्धेत खंड पडला. २०२० मध्ये सौराष्ट्र्ने हि स्पर्धा जिंकली होती. मात्र २०२१ मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे हि स्पर्धा त्या हंगामासाठी रद्द करण्यात आली होती. रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक अजून आले नसले तरी ,आयपीएलची सुरुवात मार्चमध्ये करण्याची योजना बीसीसीआय करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० तर चोऱ्यांमध्ये झाली ७२ टक्क्यांची घट- अमित शहा
- “भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ
- “निःस्वार्थ समाजसेवेच्या व्यसनातून डॉ.अवचट यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले”
- वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत नवाब मलिक म्हणाले, हा निर्णय शेतकऱ्यांच्या…
- ‘बेवड्यांना समर्पित सरकार’; मुनगंटीवारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

