Share

“भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ

Published On: 

मुंबई: सध्या मालाड येथील क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान नावावरून चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते राज पुरोहित (BJP leader Raj Purohit)यांनी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच भाजपकडून आंदोलनही करण्यात आले. यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष रंगला आहे.

यावरच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister of State for Minorities Nawab Malik) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भारतीय संविधानात राणी लक्ष्मीबाई तथा टिपू सुलतानच्या पराक्रमाला स्थान देऊन गौरवान्वित केले गेले. त्यामुळे भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित आहे. खोटा इतिहास भाजपकडून रचला जात आहे. संविधान बदलण्याबाबत पुन्हा पुन्हा बोलले जात आहे. साथियो सावधान!” असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीटसोबत संविधान प्रतचाही फोटो पोस्ट केला आहे. याअगोदरही नवाब मलिक यांनी टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. इंग्रजांशी लढत असताना टिपु सुलतान शहिद झाले. इंग्रजांशी लढत असताना कधीही त्यांनी हार मानली नाही. ते स्वातंत्र्यसेनानी होते. त्या काळात त्यांनी इंग्रजांना हादरुन सोडले होते. मात्र सध्या त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम भाजप करत आहे. कर्नाटकामध्येही भाजपने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा (B.S. Yediyurappa) यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!