सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची मानापमान नाट्यामुळे चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे. अगदी कार्यक्रमाच्या स्थळी देखील राणे आणि ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे देखील पाहायला मिळाले. दरम्यान, आता या कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील अशी ग्वाही दिली आहे.
कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे!
सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.#chipiairport @narendramodi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 9, 2021
भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांचे मनापासून आभार. सर्व कोकणवासियांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 9, 2021
कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे! सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी या विमानतळासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली आणि आज ते स्वप्न साकार झाले.
फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांचे मनापासून आभार. सर्व कोकणवासियांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन!
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

