पुणे : येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कसून तयारी सुरु केली आहे. युती-आघाडीचे समीरकरण बदलल्यानंतर होणाऱ्या या महत्वाच्या निवडणुका असल्याने जनता कोणाला कौल देणार हे महत्वाचं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना देखील इच्छूक असल्याचे समोर आले आहे.
काल, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन्ही शहरांमध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावा असे आवाहन शिवसैनिकांना आणि नेत्यांना केलं आहे. दरम्यान, याबाबत शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समनव्यक रवींद्र मिर्लेकर यांनी बोलताना काही शिवसेनेतून बाहेर पडलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं आहे.
‘जे गेले त्यांच्या विषयी चिंता नाही. शिवसेनेतून अशी अनेक लोक गेलेले आहेत. मातब्बर गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे हा खरा इतिहास आहे. पक्षातून नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ गेले तरी काही फरक पडला नाही. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे हाच खरा इतिहास आहे. कालचे आलेले गेले तर त्याने काही फरक पडणार नाही. हे तुम्ही आम्ही उभे केलेले भस्मासूर आहेत,’ असा घणाघात रवींद्र मिर्लेकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- ‘श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवानगडावर येणार, तुम्हीही या!’, पंकजा मुंडेंची साद
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

