Share

‘तर’ आम्ही सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांकडे राणेंच्या गुन्ह्यांच्या तपासाची मागणी करणार :- विनायक राऊत 

Published On: 

मुंबई : शिवसेना पक्ष आणि राणे परिवार यांच्यातील वाद पूर्ण महाराष्ट्राला परिचतच आहे. नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यावर हा वाद रोजच होत आहे. मध्यंतरी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर , शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईमधील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गुंडागर्दीचे आरोप केले होते. काल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आम्हाला खुल्या मैदानात भेटावे असे आवाहन केले होते. तर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. ते काहीच काम करत नाही. ते नुसते मातोश्री या स्वतःच्या घरी बसून असतात. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट बैठकीला पण कधीच जात नाही, एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात सुद्धा गेले नाहीयेत.

त्यांना राज्याच्या कारभाराचे काहीच पडले नसून त्यांच्या जागी इतर कोणी मुख्यमंत्री असत तर त्यांनी मला काम जमत नाहीये असं म्हणून मुख्यमंत्री पदाचा कधीच राजीनामा दिला असता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे लोकसभा मतदार संघाचे  खासदार विनायक राऊत यांच्यावर पण टीका केली आहे.

या नारायण राणे यांच्याच टीकेला आज खासदार विनायक राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ”नारायण राणे यांची आणि त्यांच्या परिवाराची सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्यांनी आत्ता पर्यंत अनेक राजकीय खून केले आहेत. कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव राऊत यांच्या वडिलांचा खून सुद्धा राणे यांनीच केला आहे. त्यांनी जिल्ह्यात अनेक खून केले असून प्रचंड दहशतीमुळे ते खून कधीच समोर येत नाहीत. मात्र नारायण राणे यांनी केलेले राजकीय खून आणि त्यांचे इतर काळे गुन्हे याविरोधात आम्ही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असून राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या गुन्ह्यांचा तपास करावा अशी मागणी आम्ही करणार आहोत” . अशी टीका आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे लोकसभा मतदार संघाचे  खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!