Share

राणा पाटील यांनी दिला वाटतं आमदारकीचा राजीनामा ? मतदारसंघात उलटसुलट चर्चा

Published On: 

टीम महारष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेत उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आ. राणा जगजितसिंह पाटील हे देखील भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला आता अजूनचं पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कारण आज ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा देताना राणा पाटील यांनी आपल्या नावापुढील ‘आमदार’ पद हटवले आहे. त्यामुळे राणा जगजीतसिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची उलटसुलट चर्चा संपूर्ण मतदारसंघात पसरली असून भाजप प्रवेश निश्चित असल्याचं मानल जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आ. राणा जगजीतसिंह पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा जगजीतसिंह पाटील यांनी आजवर ही अफवा असल्याचं म्हंटल होत. आता बकरी ईदच्या शुभेच्छा पत्रावरुन त्यांनी आपल्या नावापुढील आमदार पद हटविल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान आ. राणा पाटील हे 10 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार होते मात्र कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुर आल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर पाणी फिरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उस्मानाबादेत २० ऑगस्ट रोजी येणार होती, पण सांगली, कोल्हापुरात महापूर आल्याने त्यांना ही महा जनादेश यात्रा गुंडाळावी लागली. १० आणि २० ऑगस्ट रोजीचा मुहूर्त हुकल्यामुळे राणा पाटील यांचे भाजप प्रवेशाचे घोडे अडले आहे. आता त्यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त कधी लागणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!