टीम महाराष्ट्र देशा- लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीत नाट्यमयरीत्या आज राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तोडपाणी करणाऱ्या नेत्यांबद्दल काय बोलणार? मी योग्य वेळी माझी भूमिका स्पष्ट करेन असं रमेश कराड यांनी म्हटलं आहे.
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली आहे.गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आता कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे वांदे झाले आहेत.
ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.
कोण आहेत रमेश कराड?
रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.
लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

