Share

Ramdas Kadam । अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; ‘या’ नेत्यांवर टीका करत म्हणाले,

Published On: 

🕒 1 min read

Ramdas Kadam । मुंबई : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा सर्वत्र निषेध होत आहे. हे प्रकरण ताजं असतानाच माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी गलिच्छ भाषा वापरली आहे. शिवसेना नेते अनिल परब, सुभाष देसाई आणि विनायक राऊत यांच्यावर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली आहे.

“अनिल परबांनी शिवसेना संपवण्याची सुपारीच घेतलीय. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं आजुबाजूला लागतात”, असं म्हणत रामदास कदमांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे. यावेळी त्यांनी परब यांच्यासह सुभाष देसाई आणि विनायक राऊत यांचाही उल्लेख केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, “अनिल परब (Anil Parab) यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला पाहिजे. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होत आहे? हेच मला कळत नाही. माझ्या मुलावर सगळ्यात जास्त अन्याय अनिल परबांनी केलाय. दापोली आणि मंडणगडची नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. पण अनिल परबांनी माझा मुलगा योगेश कदम यांना बाजुला ठेऊन, या नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम केलं.”

पुढे ते म्हणाले, “सुभाष देसाई हा कान चावणारा आणि कानात बोलणारा माणूस आहे. जोपर्यंत हे नेते उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूला आहेत, तोपर्यंत त्या पक्षाचं काहीही खरं नाही,” असंही रामदास कदम यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!