🕒 1 min read
Sanjay Gaikwad | बुलढाणा : आदित्य ठाकरे हे शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या चुन चुन के मारेंगे या वक्तव्यावर आव्हान केले होते. “चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे, अशी विधाने जिल्ह्यातील एका आमदाराने केली होती. त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी पाठीमागून वार केले नसते, त्यांनी आता समोर यावे. मी त्यांच्या मतदारसंघात आलोय”, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय गायकवाड म्हणाले, “मी लहान मुलांवर आजपर्यंत कधी हात टाकलेला नाही आणि टाकणार नाही. आदित्य ठाकरे हे लहान असताना मी त्यांना खांद्यावर घेतले होते. आम्ही ठाकरे कुटुंबाचा आदर करतो. त्यामुळे त्यांनी जरी हाणामारीची भाषा केली असेल. तरी मी तशी भाषा करणार नाही. आपण जो चुन चुन के मारेंगे असा इशारा दिला होता. तो अतिशय खालच्या दर्जात टीका करणाऱ्या स्थानिक नेत्यांना दिला होता.”
उद्धव गटातील लोकांना “चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे”. मी आणि माझे कार्यकर्ते किती वेडे आहोत हे बुलढाण्यातील प्रत्येकाला माहीत आहे. अशी धमकी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यापूर्वी दिली होची. गायकवाड शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खुली झाली आहेत काश्मीर मधली ‘ही’ चार सुंदर ठिकाण
- Sambhaji Bhide | “सुधाताईंनी कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं, पण हे महाशय हट्टाला पेटले होते”; कार्यक्रमाच्या आयोजकांचा दावा
- MNS on Ajit Pawar | “दया कुछ तो गडबड है…” ; मनसेची अजित पवारांवर खोचक टीका
- T20 World Cup | उद्या ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंना मिळणार ICC Hall of Fame सन्मान
- Jayant Patil । “कुणाला पदरात घ्यायचे आणि कुणाची ओझी उचलायची हे भाजपने ठरवावे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
