टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी तिढा निर्माण झाला आहे.दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटले आहे की, राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. तसेच शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करत असेल तर माझेही शरद पवारांसोबत चांगले संबंध असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी आठवले यांनी आपल्या खास शैलीत ‘शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा कारण उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा’ अशी कविताही आठवले यांनी केली.
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा प्रयोग देशात कुठेच झाला नाही. त्यामुळे शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी योग्य नाही. उपमुख्यमंत्री त्यांनी घ्यावं. शिवसेनेच्या जागा जास्त असत्या तर मी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला असता असेही आठवले म्हणाले.
दरम्यान,शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे राजकारण गुंडांपेक्षा घाण आहे. भाजपने सत्तेसाठी प्रशासकीय यंत्रणांचा वापर केला साल्याचा आरोप राउत यांनी भाजपवर केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे हे सत्तास्थापनेच्या अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत असंही ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी चर्चा झाली तर मुख्यमंत्री पदाविषयी होईल.तसेच शिवसेनेकडं 175 आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांच्याविषयी बोलताना ते राज्याच्या राजकारणात परतणार नाहीत असं विधान केले आहे. तसेच सत्तेचे समीकरण जुळल्यास ते आम्ही माध्यमांसमोर मांडू असाही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190960301727830017?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190962956151820289?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190967991933947905?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190968419903889409?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

