🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले नसून चुकले आहेत. या दोन्ही पक्षांना जनभावना नेमकी ओळखण्यात चुकले आहेत असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला आहे. आज चांदीवली विधान सभेचे महायुतीचे उमेदवार दिलीपमामा लांडे यांच्या प्रचारार्थ साकिनाका येथे आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने वर्षोनुवर्षे दलितांना सरकार संविधान बदलणार असा गैरसमज पसरवीला . हिंदू मुस्लिम वाद लावण्यात आले.त्यामुळे जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकविला. आता तर काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांचे पक्ष सोडून भाजप शिवसेने मध्ये प्रवेश करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा जनमानसात असल्यामुळे भाजप प्रणित एनडीए देशात आणि महायुती राज्यात कायम प्रचंड विजय मिळवीत राहील असा बुलंद विश्वास व्यक्त करून जोपर्यंत आरपीआय भाजप शिवसेना महायुती सोबत आहे तो पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी कधीही सत्तेत परत येऊ शकत नाहीत असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत सह महाराष्ट्रातून महायुतीच्या अनेक उमेदवारांना त्यांच्या प्रचारसभेसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची तारीख हवी आहे. महायुती चे स्टार प्रचारक म्हणून रामदास आठवले यांच्या सभांना उमेदवार प्राधान्य देत असून मुंबईत घाटकोपर पूर्व येथे महायुतीतुन भाजपचे पराग शाह , वडाळा येथे महायुती भाजपचे कालिदास कोळंबकर ,चांदीवली मध्ये महायुतीतुन शिवसेनेचे दिलीपमामा लांडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आणि रोड शो रामदास आठवलेंनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
