Share

आम्ही कॉंग्रेसला सत्तेवर येऊनचं देणार नाही : रामदास आठवले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेचे अध्यक्ष म्हणून भाजप खासदार ओम बिर्ला यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. बिर्ला यांची सभापती पदी नियुक्ती झाल्यानंतर सभागृहातील अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या तर कॉंग्रेसवर टोलेबाजी केली.

बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात हसवणार असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच अधेमध्ये मला सभागृहात बोलण्याची संधी द्या अशी देखील विनंती आठवले यांनी यावेळी केली.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमतात निवडून दिले आहे. पुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचंच सरकार असेल असं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आम्ही तुम्हाला सत्तेत येऊच देणार नाही, असं आपल्या शैलीत काँग्रेसला सांगितलं. तसेच ते पुढे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. परंतु हवा कोणत्या दिशेने जात हे मी अचूक ओळखलं आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!