तुळजापूर – तुळजाभवानी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. शासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयीच्या सर्व नियमांचं पालन करून नवरात्र काळात पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत मर्यादित संख्येत भाविकांना इथे प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पासही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
भाविकांना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरच्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, शिवाय त्यांच्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करताना 72 तासांच्या आतला कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असणं बंधनकारक असेल. तसंच 5 वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया आणि 10 वर्षांखालच्या मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
18 ते 20 ऑक्टोबर या काळात बाहेरच्या नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर यांनी दिली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला मुंबईतील मुंबादेवी मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणं बंधनकारक असणार आहे. मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरात हार, फुलं किंवा प्रसाद नेण्यासही सक्त मनाई आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- मुख्यमंत्री ठाकरेंनी पंचनाम्यासारखे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तत्काळ मदत करावी-विनायक मेटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

