🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपमधून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सध्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. काल विधानसभा निवडणूक निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रा.शिंदे यांनी कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
प्रा.शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते की, १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, मग ते आमदार कुठे गेले? भारतीय जनता पार्टी ही देशातील सर्वात मोठी पार्टी आहे. त्यामुळे भाजपमध्ये भरती-ओहोटी काही येणार नाही. तसेच ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी खडसे विरोधी पक्षनेते असताना ते प्रमुख साक्षीदार होते. त्यामुळे त्यातील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे, असा आरोप प्रा.राम शिंदे यांनी केला आहे.
सध्या ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. खडसेंची साक्ष यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे त्यांना फोडून राष्ट्रवादीला काहीही उपयोग होणार नाही. या प्रकरणातील आरोपींवर निश्चितच कारवाई होईल. तसेच आगामी काळात कोणीही भाजप सोडून दुसरीकडे जाणार नाही, असा विश्वास प्रा.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, नगरसेविका राखी शहा, काका धांडे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीच्या खासदाराविरोधात विरोधात हक्कभंग प्रस्ताव
- आमदारांनी बारामतीच्या वस्तू येथे आणून स्वतःचा व्यापारच वाढविला; राम शिंदेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप
- ‘सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदारच राष्ट्रवादीने फोडला’
- महिला अपक्ष आमदार करणार शिवसेनेत प्रवेश,भाजपला आणखी एक धक्का
- ‘राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील मात्र भाजप उ. महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
