Share

स्वाभिमानी कर्जत-जमखेडकर कुठल्याही गोळ्या-बिस्किटाला बळी पडणार नाहीत – राम शिंदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यांनी आज सकाळी कर्जत तालुक्यातील वडगाव गावातून दौऱ्याची सुरुवात केली यावेळी त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. पुढे दूरगाव या गावाला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. यावेळी दूरगावातील अस्लम शेख, अफसर शेख, लालभाई शेख, इकबाल शेख, जाकीर शेख, सादिक शेख, रामभाऊ केंदळे, अण्णाभाऊ निंबाळकर यांनी राम शिंदे साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

त्यानंतर राम शिंदेंनी पिंपळवाडी, तळवाडी, धालवाडी, बारडगाव दगडी, येसवडी , करमनवाडी, ताजु व बारडगाव बुद्रुक या गावांना भेट दिली व येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावा-गावात व प्रत्येक वाडीवर जनसुविधा पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यामुळे जनतेचा मनात कुठलाही द्वेष नाही याची खात्री आहे असं राम शिंदे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी ‘कुणी कितीही चुकीच्या पद्धतीने गोष्टी मांडल्या तरी जी वस्तूस्थिती आहे ती इथला स्वाभिमानी कर्जत-जामखेडकर जाणतो हे गावोगावी जाऊन घेतलेल्या ग्रामस्थांच्या भेटीतून दिसून येतंय. विरोधी पक्षातील लोकांना विकास करायचा असेल तर त्याचे एक कर्जत जामखेडकर म्हणून मी स्वागत करतो. सरकारच्या माध्यमातून मी काही कामे केलीत आणि काही त्यांनी केलीतर आनंदच आहे परंतु कुठल्याही गोळ्या-बिस्किटाला आपले स्वाभिमानी कर्जत-जमखेडकर चुकूनही बळी पडणार नाहीत असा विश्वास यावेळी राम शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना त्यांनी यावेळी उद्या सिद्धटेक येथील महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विजय संकल्प सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यावेळी भाजपा व महायुती मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182543372642209792?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182541555355152385?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!