मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणा’च्या (म्हाडा) पेपरफुटी प्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. मात्र यामधील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या अ पोलिस कोठडीत येत्या २३ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान यावरच भाजप नेते राम सातपुते यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रांगोळी करणाऱ्याची गय करू नका, अशी मागणी केली आहे.
पेपरफुटीतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा.जे कोणी सहभागी असतील त्यांना कोपरा पासून ढोपरापर्यंत सोलून काढा. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रांगोळी करणाऱ्याची गय करू नका. संतापजनक कृत्यास शिक्षा झालीच पाहीजे. असे ट्वीट राम सातपुते (Ram Satpute) यांनी केले आहे.
पेपरफुटीतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा.जे कोणी सहभागी असतील त्यांना
कोपरा पासून ढोपरापर्यंत सोलून काढा.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख रांगोळी करणाऱ्याची गय करू नका.
संतापजनक कृत्यास शिक्षा झालीच पाहीजे.@OfficeofUT @Dev_Fadnavis @maharashtra_hmo @DGPMaharashtra— Ram Satpute (@RamVSatpute) December 21, 2021
दरम्यान पेपरफुटीतील आरोपींची ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक डॉ. प्रीतीश दिलीपराव देशमुख ,अंकुश रामभाऊ हरकळ आणि संतोष लक्ष्मण हरकळ अशी नावे आहेत. आरोपींचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्याचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. प्रीतिश देशमुखच्या घर व कंपनीच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये २३ हार्ड डिस्क, एक फ्लॉपी डिस्क, ४१ सीडी व इतर कागदपत्रे सापडले आहेत. हरकळचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या परीक्षांची कागदपत्रे, उमेदवारांच्या याद्या व पेनड्राइव्ह साहित्य हस्तगत केले आहे. त्यामध्ये या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …पण कोरोनाची दहशत संपणार कधी?
- छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- ६८ वर्षीय महिलेची गजब याचिका; ‘लाल किल्ला माझ्या नावावर करा’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर


