Share

‘भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकारच नाही, बाळासाहेब थोरातांचा टोला

Published On: 

मुंबई : दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात ठिकठिकाणी दूधआंदोलनाला सुरुवात केली आहे. अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘भिक नको घामाचे दाम द्या’ अस म्हणत शेतकरी आंदोलन करत आहेत.

मोठी बातमी : दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक

दरम्यान यानंतर दूध दरासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक होणार असून मंत्री, शेतकरी संघटना तसेच प्रशाकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. यातच दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर काँग्रेसचं टीका सत्र सुरुच आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपला निशाण्यावर घेत त्यांना दूध दरासाठीचं आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं ते म्हणाले.

‘भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही’, असं म्हणत भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलनही करत होते. पण, त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सरकार जातानाच त्यांनी थोडी मदत केली, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला जोरदार टोला लगावला. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे असं म्हणत थोरात यांनी भाजपला मात्र आंदोलनाचा अधिकार नाही, हीच बाब उचलून धरली. तेव्हा आता थोरातांचा हा टोला आणि त्यांनी अधिकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाची काय भूमिका असणार याकडे अनेकांचं लक्ष असेल.

आज ग्रामपंचायतवर प्रशासक उद्या मतदानाचा हक्क हिरावून घेणार का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!