🕒 1 min read
मुंबई – ड्रग्ज रॅकेट प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली.त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे एनसीबीची कारवाई वादाचा विषय बनली आहे. ड्रग्ज प्रकरणात ज्यांच्या जावयाला अटक झाली होती असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे एनसीबीवर तसेच भाजपवर या निमित्ताने टीका करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, भाजपने देखील आता मलिक यांच्यावर हल्ला चढवला असून भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी त्यांच्यावर शरसंधान केले आहे. कुलकर्णी म्हणाले, मंत्री नवाब मलिक परभणी जिल्ह्याचे पालक मंत्री असल्याचा विसर त्यांना पडला मुंबईत बसून ड्रग्ज प्रकरणाच राजकारण करणाऱ्या मलिकानी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे . शेतकऱ्यावर अस्मानी संकट आले असताना मंत्री महोदयांनी आपल्या जिल्ह्याकडे पाठ फिरवली कशी असा सवाल राम कुलकर्णी यांनी केला.
भाजप नेते निलेश राणे यांनी सुद्धा मलिक यांच्यावर राणे स्टाईलमध्ये टीका केली आहे. नवाब मलिक महाराष्ट्र राज्यात मंत्री आहे याची खंत वाटते. जो ड्रग्सला समर्थन करतोय आणि ज्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून एक रॅकेट उधवस्त केलं त्यांच्यावर संशय घेतोय. आता राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले. काही महिन्यापूर्वी मलिकचा जावई ड्रग्समध्ये पकडला गेला होता याची आठवण देखील राणे यांनी करून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- सोलापुरात कॉंग्रेसला पडले खिंडार; दिग्गज नेत्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम आणखी एका हत्येप्रकरणी दोषी; पंचकुला न्यायालयाचा निर्णय


