टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान होणार होते. परंतु सात जागांसाठी सातच वैध अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
राज्यसभा हे राज्यांच प्रतिनिधी मंडळ आहे. विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे राज्यसभेवर प्रतिनिधी निवडले जातात. विधानसभेतील विद्यमान संख्या बळाप्रमाणे महाविकास आघाडीचे ४ तर भाजपचे ३ उमेदवार निवडून येऊ शकतात.
दोन्ही बाजूनी आपल्या संख्या बळानुसारच उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे -३ , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे-२, शिवसेना-१ आणि कॉंग्रेस-१ असे पक्षीय प्रतिनिधी राज्यसभेवर निवडले गेले आहेत.
राज्यसभेसाठी निवडले गेलेले प्रतिनिधी –
भारतीय जनता पार्टी
१) उदयनराजे भोसले
२) भागवत कराड
३) रामदास आठवले (RPI-A)
राष्ट्रवादी कॉंग्रेस
१) शरद पवार
२) फौजिया खान
शिवसेना
१) प्रियांका चतुर्वेदी
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१) राजीव सातव
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

