Share

मतदारांचा कौल असल्यामुळे माघार नाही – राजू शिंदे

Published On: 

औरंगाबाद : ही निवडणूक माझी नाही तर मतदारांची आहे. मतदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवा असे सांगितले होते, त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे, अशी प्रतिक्रिया युतीचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी दिली आहे. भाजपच्या राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी कायम ठेवली.मी सकाळपासून भांगसीमाता गडावर असल्याने फोन लागत नव्हता. मतदारांचा कौल जाणून घेऊनच मी निवडणुकीत उतरलो होतो. निवडणूक जिंकल्यानंतर मी युतीला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा देणार’ असे शिंदे यांनी सांगितले.

औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महायुती असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिला. त्याठिकाणी युतीकडून सलग दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली. आता या मतदारसंघात चुरशीची लढत दिसण्याची शक्यता आहे. कारण वंचितकडून संदीप शिरसाठ तर एमआयएमकडून अरुण बोर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राजू शिंदे हे यापूर्वी भाजपकडून महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यासोबत त्यांना महापालिकेत भाजपकडून विविध पदे मिळाली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी माघार घ्यावी म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केली. आज सकाळपासून त्यांचा फोन नॉट रीचेबल होता. त्यामुळे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे यांनी माघार घेतली नसल्याने युतीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181522059257532416?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181530076585709569?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!