नांदेड : पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.
यावर राजकीय दुकान चालविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आंदोलन करत आहे. हिंमत असेल तर त्यांनी सरकारबाहेर पडावे, असे खुलं आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांनी दिलं आहे. त्यांचा सरकारबरोबर जाऊन भ्रमनिरास झाल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी खोत यांनी केला.
माध्यमांशी बोलताना सदाभाऊ म्हणाले की, ‘राजू शेट्टींच्या आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. पण, मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा झाला होता, जेव्हा मला मंत्रीपद मिळालं होतं. आता त्यांचा पुन्हा भ्रमनिराश झालेला दिसतोय. राजू शेट्टींचं आंदोलन म्हणजे राजकीय दुकान चालवण्यासाठी आहे. या सरकारकडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टींनी बाहेर पडावं’, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.
तसेच राजू शेट्टी यांच्या आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिराश झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘करुणा शर्मा यांच्याबाबत मजकूर प्रकाशित केल्यास हायकोर्टाचा अवमान’, धनंजय मुंडेंच्या वकिलाचे माध्यमांना पत्र
- ‘मुख्यमंत्र्यांच्या घरातील दोघे पॉझिटिव्ह; अन् बेअक्कल संज्या म्हणतो पापी लोकांनाच कोरोना होतो’
- ‘तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, फक्त गणेशोत्सवालाच नको; ही कसली पद्धत?’ राज ठाकरेंचा हल्लाबोल
- ‘ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट’, राज ठाकरेंचा आरोप
- पडळकरांचे वडेट्टीवारांना ‘उद्धव ठाकरे स्टाईल’ पत्र, सहा वेळा ‘किंबहुना’ शब्दाचा वापर

