पुणे- एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधान परिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.
या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे’.
दरम्यान, विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यामधील किमान चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे शेट्टी यांच्यासारखा अनुभवी नेता विधानपरिषदेत जावा अशी शरद पवारांची भूमिका असल्याचं कळतंय.
दरम्यान, आता या मुद्द्यावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या समोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत शेतकऱ्यांचा अभ्यासू आवाज आत्ता असणे गरजेचे आहे.
देसाई म्हणाल्या, याआधी राजू शेट्टी शिरोळ मतदार संघातून आमदार ,दोन वेळा खासदार ही राहिले आहेत, राज्यात शेतकऱ्यांचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक आंदोलनामुळे त्यांनी राज्यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून पण दिला आहे त्यामुळे सध्या विधानपरिषदेत राजू शेट्टींसारखा आवाज असणे ही काळाची गरज आहे. शरद पवार साहेबांनी खूप विचार करून हा प्रस्ताव माननीय जयंत पाटील यांच्या मार्फत दिला आहे. या संधीचे सोने करण्याची वेळ आता राजू शेट्टींची आहे.
कोकण दौऱ्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात तरी भर पडेल – शरद पवार
विद्यापीठाच्या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका
राज्यपालांची हकालपट्टी करा, पंतप्रधान मोदींकडे करणार मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

