Share

शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- खासदार राजू शेट्टी

Published On: 

पैठण : राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यान राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्येचा विचार करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे , कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा, तुम्हाला फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टीं यांनी दिला. शेतकरी सन्मान अभियानामध्ये आजचा शेतकरी मेळावा एकनाथांच्या पैठण नगरीत संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान राज्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत नऊ हजार कोटी रुपयांचा भरणा केला. त्याबदल्यात शेतकऱ्यांना भरपाई म्हणून फक्त हजार अकराशे कोटी रुपये माघारी मिळाले. मग ही योजना कॉर्पोरेट कंपन्यासाठी आहे की शेतकऱ्यांसाठी? असा सवाल खासदार राजू शेट्टींनी करण्यासाठी शेतमालाला दिडपट हमीभाव आणि सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा ही दोन खासगी विधेयके अखिल भारतीय किसान संघर्ष समिती संसदेत मांडणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे .

या अभियानात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही.एम.सिंग,पश्चिम बंगाल किसान संघटनेचे अविक शहा हे सहभागी झालेत. त्यापूर्वी शेतकरी सन्मान यात्रेचं पैठणमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्याची वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!