🕒 1 min read
औरंगाबाद: परतीच्या पावसामूळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे, असे असताना भाजप-शिवसेना सत्तास्थापनेच्या केवळ चर्चा करीत आहे. अशातच राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलही आता कुठे दिसत नाही.
या विषयी सिल्लोडच्या दौऱ्यावर असलेले राजू शेट्टी म्हणाले, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्ना विषयी चिंता नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला.
सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिक पाहणी दौऱ्यात शेट्टी यांनी पाशा पटेल यांच्यावर टिका केली. राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे सातत्याने राजू शेट्टी यांच्यावर टिका करीत असतात. मात्र परतीच्या पावसामूळे राज्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहे.
यात पाशा पटेल शेतकऱ्यांच्या सोबत असायला पाहीजेत पण ते कुठेच दिसत नसल्यामूळे पत्रकारांनी राजू शेट्टींना पाशा पेटल विषयी विचारले असताना, शेट्टी म्हणाले, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता वाटेत असेल, त्यामूळे त्यांच्या भवितव्यापूढे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नसेल. याच भवितव्याच्या चिंतेत पटेल व्यसत्त असतील असा टोलाही राजू शेट्टी यांनी पाशा पटेलांना लगावला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191680418757496833?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191679338543906816?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
