Share

…तर तुमचा कणखरपणा दिसला असता, राजू शेट्टींनी केलं मुख्यमंत्र्यांना लक्ष

Published On: 

मुंबई : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय व इडीच्या रडारवर असलेल्या वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी एक परवानगीचं पत्र दिलं होतं.

कोरोनामुळे देशात लॉक असूनही नियम भंग करून खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणारे वाधवान यांच्या वरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र याच घटनेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

याबाबत ट्विटकरत शेट्टी म्हणतात, ‘न्यूझीलंड च्या राष्ट्राध्यक्षांनी लॉक डाऊन चा नियम मोडल्याबद्दल आपल्या आरोग्य मंत्र्यांचा माफीनामा फेटाळून त्यांना पदावनती लादली !उद्धवजी आम्ही तुमच्याबरोबर आहोतच पण गृह सचिव अमिताभ गुप्ता यांचेवर कठोर कारवाई चे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता’.

दरम्यान, ‘सामान्य माणसाला घराबाहेर पडायला परवानगी नसताना श्रीमंताच्या सहलीला थेट पास मिळतो आहे, अशी परिस्थिती आहे. अशी परवानगी देण्याचं धाडस सचिवात नाही. या प्रकरणाचं सत्य काय आहे हे जनतेसमोर यावं,’ अशी मागणी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!