Share

अभिनेता गेल्यावर जितकी चर्चा झाली, तितकी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल झाली असती तर…

Published On: 

अहमदनगर : सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला कलाकार होता, याबद्दल दुमत नाही. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केली.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या आधी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर तोफ डागली.

जाणून घ्या नाश्त्याला सर्रासपणे बनविल्या जाणाऱ्या पोह्यांच्या उपयुक्ततेबद्दल

राज्यात एकीकडे दूध आंदोलन पेटले असताना दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष देत आहेत असे राजू शेट्टी म्हणाले. राज्यात हजारो शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. एवढेच काय तर अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर जेवढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल, लॉकडाऊनमुळे ज्या कामगारांची घरे उद्धवस्त झाली, त्यांच्याबद्दल झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरं वाटलं असतं.

दूध प्रश्नावर राज्यामध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे. मग असे आंदोलन राजकीय नाही का, असा सवालही त्यांनी केला. दूध उत्पादक प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी देखील डोळेझाक केली आहे. दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत, असेही ते म्हणाले.

राज्याच्या प्रशासनात पुन्हा फेरबदल;चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!