🕒 1 min read
टीम महराष्ट्र देशा : पुराच्या पाण्यात एक बोट उलटल्याची मोठी दूर्घटना सांगलीत घडली आहे. सांगलीमधील पलूस तालुक्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटमध्ये २५ ते ३० जण प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान ही बोट बुडाली. बोट बुडाल्याने अनेकजण बुडाले आहेत. सांगलीतील ब्रह्मनाळ येथे नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित नेण्याचं काम सुरु होतं. त्याच दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही बोटीतील काही नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ही बोट खाजगी होती अशी माहिती समोर येत आहे. बोट नेमकी कशी उलटली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. या बोटीत एक आजी आणि चिमुरडीही होती. काळाने घाला घातला आणि यात आजी आणि चिमुरडीचा अंत झाला. आता यावरून सरकारवर चौफेर टीका होत आहे.
यावरूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ब्रम्हनाळच्या दुर्दैवी घटनेतील मन हेलावून टाकणारा एक फोटो समोर आला. या दुर्घटनेत माय-लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे एकमेकांना बिलगलेले मृतदेह फोटोमध्ये दिसतात.हा फोटो पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. पण राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर फुटत नाही का ? असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.
सरकारी अनास्थेचे, सरकारी उपेक्षेचे हे बळी.. या असंवेदनशील, बेजबाबदार आणि सत्तेची मुजोरी दाखवणाऱ्या सरकारला जोपर्यंत आपण हद्दपार करणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातचे चित्र बदलणार नाही. अशी घणाघाती टीका देखील अमोल कोल्हे यांनी केली आहे.
ब्रम्हनाळच्या दुर्दैवी घटनेतील मन हेलावून टाकणारा एक फोटो समोर आला. या दुर्घटनेत माय-लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे एकमेकांना बिलगलेले मृतदेह फोटोमध्ये दिसतात.हा फोटो पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. पण राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर फुटत नाही का? – खा. अमोल कोल्हे pic.twitter.com/nMXdf717bm
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 9, 2019
सरकारी अनास्थेचे, सरकारी उपेक्षेचे हे बळी.. या असंवेदनशील, बेजबाबदार आणि सत्तेची मुजोरी दाखवणाऱ्या सरकारला जोपर्यंत आपण हद्दपार करणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातचे चित्र बदलणार नाही. – खा. अमोल कोल्हे#Sangliflood #maharashtrafloods
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 9, 2019
दरम्यान, ब्रह्मनाळ येथून गावकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीत आजी आणि चिमुरडी होती. पण बोटीच्या इंजिनमध्ये फांदी अडकल्याने बोट उलटली आणि यात २५ ते ३५ जण पुराच्या पाण्यात कोसळले. आजीने आपल्या कुशीत चिमुरडीला गच्च पकडले आणि प्राण गेला तरी आपल्या या काळजाच्या तुकड्याला सोडले नाही. पाण्यात बुडून आजी आणि नातीचा मुत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी सुरूवातीला नऊ मृतदेह पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यात आजी आणि चिमुरडलाही बाहेर काढले. यावेळी आजीने नातीला इतके घट्ट धरून ठेवले होते की वाचविणाऱ्यांनाही त्यांना वेगळे करता आले नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

