🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे जालना जिल्ह्यात आले होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी ‘संपूर्ण शिवारासह गावच्या गावं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाली आहेत. अशावेळी पंचनामे कशासाठी मागता. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी केली. या नुकसानीला प्रशासन हा प्रश्न गांभीर्याने घेत नसून सरकारही लक्ष देत नाही असं ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना शेट्टी यांनी मागील 8 दिवस शासनाने पंचनामे सूरू करण्याचे आदेश दिल्याचं प्रशासन सांगत आहे. मात्र, अजूनही या गावात पंचनामे झालेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. मकाला कोंब फुटले आहेत, कापूस सडून चालला आहे. सर्वच पिकांची परिस्थिती अशीच आहे असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपून काढले आहे. यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी मोडून पडला आहे. मात्र, शेतकऱ्याला आधाराची गरज असताना मुंबईत सत्तेचा सारीपाट खेळला जात आहे अशी टीकाही त्यांनी भाजप-सेनेवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191919965252620288?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191916193340260354?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191728519463788546?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
