Share

राजू शेट्टी यांची महाआघाडीकडे , ५० जागांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- महाआघाडीकडे सर्व लहान पक्षांसाठी एकून ५० जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे. संगीलीत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली.

ते यावेळी म्हणाले, ”कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले राधानगरी, चंदगड, मिरज, जत, आणि खानपूर या जागांसाठी महाआघाडीकडे मागणी करण्यात आली आहे. यात थोड्याफार फरकाने आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहोत. बहुजन विकास पक्ष, शेकाप, प्रहर आदि संघटनांशी चर्चा करण्यात आली आहे. विविध संघटना या ५० जागा वाटून घेणार आहेत. ज्यात कोणतेही मतभेद नसतील असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

तसेच भाजप आणि शिवसेना विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. कोल्हापूर मधील शिरोळ, हातकणंगले आणि चंदगड तर सांगलीतील मिरज जत आणि खानापूर येथील जागांसाठी स्वाभिमानी सती मागणी करण्यात आली आहे. सध्या रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिल्याने हंगामी स्वरूपात कोल्हापूरचे अध्यक्ष जालिंदर पाटील प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे असे ही ते म्हणाले.

मनसे तुमच्या आघाडीत सहभागी होऊ शकते असे विचारल्यावर त्यांनी आमची आघाडी झाली असल्याचे सांगितले तर ते आघाडीत येणार असतील तर आम्ही नव्याने चर्चा करू असेही ते म्हणाले. तसेच सांगोल्यातून निवडणूक लढविण्यासाठी आमदार गणपतराव देशमुख आणि कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असून मी विधानसभा निवडणूक लढवेल कि नाही, याबाबत अध्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. असेही त्यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178284169681522688?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178284724592099335?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!