Share

“…त्यानंतरच गोळया झेलण्याच्या वल्गना करा”, श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्यावर राजू पाटलांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील रेल्वेमार्गाजवळ राहणाऱ्या नागरिकांना घर रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच शनिवारी(२२ जाने.)शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी येथी नागरिकांची भेट घेतली. यावेळी एका वृद्ध महिलेने हवं तर गोळ्या झेलू पण घरं रिकामी करू देणार नाही, असे म्हंटले. यावर तुम्ही का गोळ्या झेलाल आम्ही आहोत ना, आम्ही गोळ्या झेलू, असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राजू पाटील म्हणाले की,’रेल्वेने नोटीस बजावलेल्या झोपडीधारकांच्या पाठीशी प्रत्येकजण आहे. मग ते मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) असो किंवा पालकमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde). मनसेचाही या झोपडीधारकांना पाठिंबा आहे. त्यामुळे तिथे जाऊन वल्गना करण्यापेक्षा सरकार तुमचे आहे, तुम्ही रेल्वेवर उतरा. तुमच्या हाती प्रशासकीय यंत्रणा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय केले आहे? अगोदर आपल्या पदरात झाकून पहा. आपण स्वत: लोकासाठी काय करतोय आणि मग गोळया झेलण्याच्या वल्गना करा’, असा खोचक टोला राजू पाटील यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की,काल खासदार इथे कल्याणला जे रेल्वेमध्ये बाधित होत आहेत, तिथे जाऊन आले आणि त्यांनी तिथे घोषणाही केली की आम्ही गोळ्या देखील अंगार झेलू. मात्र, यांना बेघर होऊ देणार नाही. या अनुषंगानेच मी देखील ट्विट केले आहे, असेही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, ट्विटमध्ये पाटील म्हणाले होते की,’एैन दिवाळीत दिवा येथे रेल्वे पुल बाधितांना रस्त्यावर आणणारे,९० फुट रस्तेबाधितांना अजूनही घरे न देणारे,अटाळी येथील रिंगरूट मध्ये बाधीत झालेल्यांबद्दल चकार शब्द न बोलणारे रेल्वेबाधितांसाठी चक्क छातीवर गोळी झेलण्याच्या गोष्टी करत आहेत, ही तर शुद्ध नौटंकी आहे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!