Share

भन्सालींचं शीर कापून आणणाऱ्याला 5 कोटींचं इनाम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला पद्मावती चित्रपच येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून दिग्दर्शक संजय लीला भन्सालीचं शीर कापून आणणाऱ्याला 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिलं जाईल, अशी घोषणा मेरठच्या एका राजपूत नेत्याने केली आहे.तर दुसऱ्या बाजूलाअभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर हल्ला करण्याची धमकी करणी सेनेनं दिली आहे. ‘आम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचं नाक कापून टाकू,’ अशी धमकी करणी सेनेनं दिली आहे.

संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ सिनेमाची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे वादही उफाळून येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर दीपिका पादूकोणचं नाक कापू, अशी धमकी श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.तसंच 1 डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित झाला तर राजपूत संघटना भारत बंदची हाक देईल. प्रदर्शनाच्या दिवशी आम्ही देशभर आंदोलन करणार असल्याची घोषणा करणी सेनेचे लोकेंद्र सिंह यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!