Share

रजनी पाटील विजयी होणार, महाविकास आघाडीचा विश्वास; उमेदवारी अर्ज दाखल

Published On: 

मुंबई : काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत. तर आता काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तर एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही. ही माहाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. दरम्यान आता रजनी पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे.

अर्ज छाननीतून रजनी पाटील बाहेर पडतील, अशी माहिती पाटील यांनी दिली. काँग्रेसने रजनी पाटलांना तिकीट दिले आहे. त्यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहे. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे रजनी पाटील या राज्यसभेच्या मैदानातून बाद होणार का? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!