नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकार तीन पक्षांचे सरकार आहे . मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याचा घणाघाती टोला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही. अस देखील राजनाथ सिंग म्हणाले आहेत. . भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, “जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. मी भाजपाचं चारित्र्य स्पष्ट करु इच्छितो. आम्ही धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे,” असं देखील राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
एक नवीनच कार्यपद्धत संजय राऊत यांनी विकसित केली, सुधीर मुनगंटीवारांची सडकून टीका
“करोनासंबंदी महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती गंभीर चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मोदी सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे,” असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे.
…. म्हणून चक्क देवेंद्र फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार


