🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने 12 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंधखेड-राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा अखेर होणार आहे. सभेसाठी पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे. सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. राज्यातील परिस्थीती पाहता सुरक्षेच्या कारणातून ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट करण्यात आले होते मात्र, आता सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीने जिजा मातेचे जन्मस्थान असलेल्या सिंधखेड-राजा येथील श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात 12 जानेवारी रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वतः अरविंद केजरीवाल यांनी मराठीत ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी सिंधखेड राजा येथे येत आहे असेदेखील त्यांनी ट्वीट केले.
नमस्कार,
राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला मी सिंदखेड राजा येथे येत आहे.— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 9, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
