परभणी: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख बलात्कार प्रकरणी अडचणीत आले आहेत. शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला ‘बी समरी’ अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली येऊन तपास केल्याचे दिसत आहे. फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्यानुसार तपास होण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्यानुसार तपास करण्यात आला. फिर्यादीलाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपास करावा. पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान आता यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मेहबूब शेख यांचं प्रकरण हे न्यायिक प्रकरण आहे. त्यामध्ये आताच बोलणं किंवा कुठलीही कमेंट करणं योग्य नाही. न्यायिक प्रक्रिया ही त्याच्या त्यांच्या पद्धतीने चालते. त्यामध्ये हस्तक्षेप करणं आणि बोलणं योग्य नाही. ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्या प्रक्रियेला मेहबूब शेख यांच्याकडून सहकार्य केले जाईल. अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली आहे.
दरम्यान सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अॅड. आय. डी. मणियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या ‘बी समरी’ अहवालात योग्य ते पुरावे जोडलेले नाही. त्यामुळे अहवाल स्वीकारणे योग्य नसून हा अहवाल रद्द करावा, असे सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाच्या या आदेशाने महेबूब शेख यांना चांगलाच दणका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांवर अत्याचाराची तिसरी लाट आलीय कोरोनाची नाही; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी

