मुंबई : विरारमधील घटनेत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेत. तर विरारमधील घटनेवरुन भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सर्व पार्श्वभूमीवर एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असे वक्तव्य राजेश टोपेंनी केलेय. यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय.
राजेश टोपेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केलाय. “किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे!अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. @rajeshtope11 तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो. https://t.co/X7DSPX8Y5z
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 23, 2021
काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?
पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधनांशी चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असं म्हटले. “पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडिसिविरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत,” असं टोपेंनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘विरारची दुर्घटना नॅशनल न्यूज नाही’, आरोग्यमंत्री टोपेंचे धक्कादायक वक्तव्य
- लॉकडाऊनबाबत अमृता फडणवीसांकडून ठाकरे सरकारचे समर्थन
- ‘यंत्रणांवर ताण आहे माहितेय, पण यातून काही बोध घ्यायचा नाही का?’
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट

