Share

आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवलं, भाजपच्या मित्रपक्षाचा टोला

Published On: 

मुंबई : आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हीरकमहोत्सवी म्हणजेच ६० वा वाढदिवस आहे. ठाकरेंवर अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एका शुभेच्छापर पोस्टची चर्चा जास्त होत आहे. ती म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री १२ वाजताच दिलेल्या शुभेच्छा व त्यासोबत शेअर केलेला फोटो!

काल संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग देखील प्रसिद्ध करण्यात आला, ज्यात ठाकरेंनी अनेक खुलासे आहेत. यातील एका प्रश्नात, विरोधक हे तीन चाकी सरकार असून कधीही पडेल असे सांगतात यावर उत्तर देताना ते म्हणाले, हे तीन चाकी रिक्षाचे सरकार असून स्थिर आहे. ज्यात सरकारचे स्टेअरिंग माझ्या हातात आहे तर दोघे मागे नीट बसले आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आपल्याचा हातात स्टेअरिंग असल्याचे म्हणू द्या, पण अजितदादांनी फोटो ट्विट करून सगळं सांगितलं आहे. आम्हाला काय म्हणायचं ते अजित पवार यांनीच सांगितले आहे. अजित पवार हे मंत्रालयात बसून काम करतात. सध्या महाराष्ट्राचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु हे सरकार दुसरं कोणी पाडायीच गरज नाही, ते स्वत:च पडतील, असे विनायक मेटे यांनी म्हटले.

सेवाग्राम बापू कुटीला भेट देताना राज्यपालांनी विचारला ‘हा’ महत्वाचा प्रश्न…

तसेच महाराष्ट्रात दोन नव्हे तर तीन मुख्यमंत्री असल्याचा दावाही विनायक मेटे यांनी केला. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार हे तीन मुख्यमंत्री सध्या कारभार पाहत पाहेत. दुर्दैवाने काँग्रेस या सगळ्यातून बाहेर आहे. आपण सरकारमध्ये आहोत, हे काँग्रेस स्वत:ही मान्य करत नाही. काँग्रेस पक्ष फक्त नावापुरता सरकारमध्ये आहे. खरे बघायला गेले तर दोनच पक्ष सरकारमध्ये असल्याचेही मेटे यांनी म्हटले.

हा फोटो, जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारामती दौऱ्यावर गेले होते त्यावेळी काढलेला असून यात एका गाडीत उद्धव ठाकरे व अजित पवार बसले आहेत. मात्र, यात एक खास गोष्ट आहे जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे, अजित पावरांच्या हातात असलेलं स्टेअरिंग. त्यामुळे, नेहमीच रोखठोक स्वभावाने परिचित असलेले दादा या फोटोतुन काही खुणावू पाहत आहेत का? यावर मात्र आता अनेक चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देत एक फोटो ट्वीट करून सूचक इशारा दिला आहे.सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्ष जरी असले तरी स्टिअरिंग हे माझ्याच हातात आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी गाडीची स्टिअरिंग आपल्या हातात असल्याचा इशारा केला आहे.

#व्यक्तीविशेष : उद्धव ठाकरे – एक छायाचित्रकार मुख्यमंत्री कसा बनला ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!