🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. स्पर्धा रद्द झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेले अनेक खेळाडू स्वगृही परतले.
यादरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू चेतन सकारिया हा घरी न जाता कोरोना बाधित वडिलांना भेटायला गेला होता. मात्र रविवारी चेतन सकारियाच्या वडिलांचे दुर्दैवी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर चेतन सकारियाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या संकटाच्या काळात आयपीएलमध्ये चेतन सदस्य असलेल्या राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी त्याच्या मदतीला धावले आहे. चेतनच्या वडिलांच्या निधनाची वार्ता समजताच राजस्थान रॉयल्सने ट्विट करत चेतन साकारियाच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करणार असल्याचे सांगितले. त्याच्या या दु:खात आम्ही त्याच्या पाठीशी आहोत असे राजस्थान रॉयल्सच्या ट्विटमध्ये लिहीले आहे.
It pains us so much to confirm that Mr Kanjibhai Sakariya lost his battle with Covid-19 earlier today.
We're in touch with Chetan and will provide all possible support to him and his family in this difficult time.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 9, 2021
आयपीएल स्थगित होण्यापुर्वी चेतनचे वडिल कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. स्पर्धा स्थगित होताच चेतन घरी न जाता थेट वडिलाकडे गेला. त्याचे वडिल हे गुजरातमधील भावनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी ९ मे रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. यानंतर राजस्थानच्या संघाने ट्विट करत त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझ्या भावाचा दंड भरण्यास तयार आहे’, भावासाठी कामरान अकमल सरसावला पुढे
- मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट
- श्रीलंका दौऱ्यावर नसणार विराट-रोहित
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
