मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली आणि अनिश्चीत काळासाठी आयपीएल स्पर्धा स्थगित केली.
आयपीएलमध्ये राजस्थान संघाचा महत्वाचा खेळाडू चेतन सकारियाच्या वडिल कांजीभाई यांना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. गुजरात मधील भावनगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी ९ मे रोजी आखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर थेट घरी न जाता चेतन त्याच्या वडिलाना भेटायला गेला होता. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तो त्यांच्याजवळ बसुन रहायचा.
चेतनच्या वडिलाना मधुमेहाचा त्रास होता. मात्र रविवारी आखेर त्याच्या वडिलाची प्राणज्योत मालवली. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकारियाने काही महिन्यांपुर्वीच त्याचा भाऊ राहुल सकारियाला गमावले होते. राहुलने आत्महत्या केली होती. आयपीएल २०२१ लिलावात सकारियाला राजस्थान रॉयल्सने १.२० कोटींना विकत घेतले होते. या हंगामात ७ सामने खेळताना त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ३१ चेंडूवर ३ विकेट्सचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोनाने ११ जणांचा मृत्यू; ६२९ नव्या रुग्णांची वाढ
- वाहतूक तर बंद मग लसीकरणाला जायचे कसे? ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रश्न
- फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि मागासवर्गीयांचा बळी द्यायचा, हा कसला सामाजिक न्याय ?
- ‘राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करावी’
- जालन्यात कोरोनाचा कहर; ५८४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
