(Rajan Salvi) रत्नागिरी : गेले अनेक दिवसांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात खडाजंगी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही चांगलीच शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या मालीकेत भाजप नेते नितेश राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है, असा दावा नितेश राणे यांनी केला होता. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या या दाव्याला राजन साळवी यांनी त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
राजन साळवींनी राणे कुटुंबीय ठाकरे गटासोबतच असल्याचं विधान केलं आहे. “नितेश राणे आमचा विरोधक आहेच. राणे कुटुंबीयांना समजायला हवं की आज नारायण राणे, नितेश राणे किंवा निलेश राणे या कुटुंबाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभला म्हणून ते मोठे झाले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करणं फार चुकीचं आहे. मी शिवसेना प्रमुखांशी, शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही. मी तर म्हणेन, ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है”, असं साळवी म्हणाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहणार आहे. कोकणाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला कायम राखल्याबद्दल उद्धवजींनी पण अभिनंदन केलं असल्याचं राजन साळवी (Rajan salvi) म्हणालेत. भास्कर जाधव हे शिवसेनेचे आक्रमक नेते आहेत. जे त्यांच्या मनात असते. तेच त्यांच्या हृदयात आणि ओठांवर असते. भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचं उत्तर देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम असल्याचं साळवी म्हणाले. भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो, असं ते म्हणाले.
राजकारणातील पातळी खालावत चालली आहे. काही विद्ध्वंसक मंडळींकडून चुकीच्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अंगावर आल्यानंतर शिंगावर घ्यावाच लागतं ही भूमिका आमची आहे. राजकारणाच्या पलिकडेही काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. क्रीडा क्षेत्रासारखे काही क्षेत्रं राजकारणाच्या पलिकडची आहेत. त्यामुध्ये कोणीही राजकारण आणू नये, असं आवाहन साळवी यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आता पवार आणि शेलार पॅनल देखील ‘या’ स्पर्धेत उतरले असून…”, एकनाथ शिंदे
- Sameer Wankhede | “उपमहासंचालकांनी माझा छळ केला”, समीर वानखेडेंचा एनसीबीवर धक्कादायक आरोप
- Deepali Sayyed | दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या, “लवकरच माझा…”
- Jayant Patil | “बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमरांना आता पश्चाताप होता आहे”, जयंत पाटलांचा दावा
- Devendra Fadnavis |“माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; शरद पवारांच्या विधानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…


