Share

Jayant Patil | “बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमरांना आता पश्चाताप होता आहे”, जयंत पाटलांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामध्ये तब्बल 40 आमदारांचा समावेश होता. आशाताच या बंडात सामील होऊन गेलेल्या आमदारांना पश्चाताप होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. एवढंच नाही तर यामुळे पुढील काळात महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या आमदार आता आपल्या विद्रोहाचा पुनर्विचार करत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. पहिल्या दिवसापासूनच या सरकारमध्ये काहीच अलबेलं नाही, जी लोक बंडात सामील होती त्यांचे आपले काही उद्देश, लाभ ठरवले होते, हे देखील आता जनतेच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे काही आमदार आता पश्चातच करत असून पुढील काळात महाराष्ट्रात वेगळ चित्र दिसेल, असा इशारा देखील जयंत पाटील यांनी दिला आहे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नामोहरण करणे, त्यांना अडचणीत आणणे असे उद्योग राज्यात काही लोक करत असून ठाकरे यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावला बळी पडणार नाहीत, असे देखील जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हानी आणि अतिवृष्टी, पुण्यात झालेली दूरदशा याकडे राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे, राज्य सरकारने या प्रकरणांमध्ये लक्ष घालून मदत देखील केली पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिवस दिल्लीला सांभाळण्यात जात आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे शहराची वाहताहात झाली, सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे, मराठवाडा शेतकऱ्यांच्या पिकांची देखील मोठी हानी झाली आहे. मात्र एकनाथ शिंदे दुसरीकडे अडकले असल्याचा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!