Share

भाजपचे गुंड शेतकऱ्यांना हुसकावून देतात : राज ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ठाण्यात आंबा विक्रेत्यावरून सुरू झालेला भाजप-मनसेचा राडा आता अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ठाणे महानगरपालिकेवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, शेतकरी बाजार पेठांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत असताना केवळ श्रेय मिळू नये, यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व गुंड अशावेळी प्रशासनावर दबाण आणून शेतकऱ्यांना हुसकावून लावायचे प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं ठाण्यामध्ये रत्नागिरीचा एक शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नौपाडा विभागामध्ये आंब्याच्या हंगामामध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय करत होता. असा आशयाचे पत्रक राज ठाकरे यांनी काढले आहे.

राज ठाकरेंनी पत्रक काढून स्पष्ट केली भूमिका

शेतकरी बाजार पेठांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत असताना केवळ श्रेय मिळू नये, यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व गुंड अशावेळी प्रशासनावर दबाण आणून शेतकऱ्यांना हुसकावून लावायचे प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं ठाण्यामध्ये रत्नागिरीचा एक शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नौपाडा विभागामध्ये आंब्याच्या हंगामामध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय करत होता. भाजपचे दहा नगरसेवक, एक जिल्हाध्यक्ष आणि असंख्य भाड्यानं लोक येऊन बळजबरीनं जर त्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला हटवत असतील आणि त्या शेतकऱ्याचा लाखभर रुपयांचा माल जप्त करून त्याच्या वार्षिक लाखभर रुपयाचे नुकसान केले जात असेल तर ते सहन करणे कितपत योग्य आहे.

शेतकऱ्यावर झालेल्या या प्रकाराला मनसेचे जिल्हाध्यक्ष तसंच महाराष्ट्र सैनिकांनी कडवा प्रतिकार केला. पण सत्तेचा दुरुपयोग करून पालिकेची मिळालेली परवानगी रद्द करून त्या शेतकऱ्याला पिटाळले जाते. केवळ एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणे योग्य नाही तर ही एक प्रातिनिधीक घटना आहे, असे समजून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. म्हणूनच शुक्रवारी १७ मे रोजी दुपारी 1 वाजता ठाण्याच्या गावदेवी मैदापासून ठाणे महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे.

शेतकऱ्यांच्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी होऊन सहकार्य करणे व केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकऱ्यांसाठी केवळ जागाच नव्हे तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाला भाग पाडणार. बाकी प्रश्नावर राज्यस्तरावर जे काही करायचे आहे ते मी करेनच परंतु तुर्तास याविरुद्ध आपण सर्वांनी आवाज उठवलाच पाहिजे. – राज ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!