टीम महाराष्ट्र देशा : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. अशातच भाजप सेनेनेमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे. दोनही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले असता त्यांना मुख्यमंत्री पदाविषयी प्रश्न विचारला असता यावर चिडून पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता? असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे यांच्या या उत्तरामुळे येत्या निवडणुकीला ते आक्रमकपणे सामोरे जातील असं चित्र दिसत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे तर शिवसेनेकडून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

