Share

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा पाठींबा

Published On: 

मुंबई: शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती, कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव अशा अनेक मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. किसान सभेच्या या लाँग मार्चला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही पाठिंबा दिला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला.

शहापूर येथील भातसा नदीच्या किनारी मुक्काम केल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. भातसा नदी ते भिवंडीतील भिनार गाव पर्यंतचे अंतर पार करुन मोर्चेकरी दुपारचे जेवण करुन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

आज भातसा नदी ते मुंबई ढाबा भिवंडी असं जवळपास ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर शेतकरी पाया चालणारेत आणि आज रात्री ठाणे शहराच्या प्रवेशद्वारा जवळ येऊन मुक्काम करणार आहेत. अधिवेशन सुरू असल्याने किसान सभेतर्फे मुंबई येथे विधानभवनाला १२ मार्चला घेराव घालण्यात येणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे विधानसभेला घेराव घालण्याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्चात सुमारे बारा हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेच्या नाशिक-मुंबई मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा
-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात
-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!