Share

‘राज ठाकरेंचे ‘ते’ विधान दखल घेण्यायोग्य नाही’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार भाजप नेत्यांना मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले, असा धक्कादायक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांचे विधान दखल घेण्या इतके योग्य नाही. त्यामुळे यावर न बोलणचं बर आहे, असे म्हणत शिरूरचे माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या लोकसभेतील पराभवाबाबत धक्कादायक विधानाला खोडून काढले आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात भाजप पक्षाला घवघवीत यश मिळालं होत. या यशात शिवसेनेन देखील हातभार लावला होता. राज्यात भाजप – सेना युती होती. त्यामुळे या युतीने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. काही मतदार संघांमध्ये मात्र युतीला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले होते. खासकरून शिवसेनेला हा धक्का होता. कारण शिवसेनेच्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे हे चारही नेते मंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र हे नेते लोकसभा निवडणुकीतचं बाजूला पडले.

शिरूर मतदारसंघात ३ वेळा खासदार झालेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे नव उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे मातब्बर नेते चंद्रकांत खैरे यांना देखील एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हे दोन पराभव शिवसेनेला जिव्हारी लागले. तर आनंद गीते आणि आनंदराव अडसुळ यांचा पराभव देखील तसा अनपेक्षित होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!