Share

राज ठाकरेंचं रुपाली पाटील यांना स्पेशल बर्थडे गिफ्ट; सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Published On: 

पुणे : आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुकवारपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही जोरदार तयारी केली आहे. याच उद्देशाने राज ठाकरेंच्या पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकऱ्यांचा नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी महिलांना पुढे करण्याच्या निर्णय घेतला आहे.

मनसेची रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या रुपाली पाटील यांच्यावर राज ठाकरेंनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. रुपाली पाटील ठोंबरेंचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन रुपाली पाटील यांना वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यमान महिला अध्यक्ष अ‍ॅड. रूपाली पाटील यांच्याकडे राज्याच्या महिला उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडीचे पत्र दिले. आगामी महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष घातले आहे.

त्यांनी पुण्यातील शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यानंतर आता महिला आघाडीमध्येही बदल केला आहे. माजी महिला शहराध्यक्ष रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या जागी वागस्कर यांनी नियुक्ती केली आहे. तसेच उपशहर अध्यक्षपदी पद्मिनी साठे, जयश्री पाथरक, अस्मिता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे शनिवारी ९ सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर १० उपशहर अध्यक्ष, ८ विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली. सध्या ते आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!