🕒 1 min read
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित लोकांच्या कंपनी, कारखान्यांवर आयकर विभागाने छापे टाकले. अजित पवारांच्या बहिणी, पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यलय आणि कंपन्यांवर आयकर विभागाने सलग तीन दिवस चौकशी कायम ठेवली. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
१०५० कोटी रुपयांची दलाली आयकर धाडीतून पुढे आली. बदल्या, टेंडर, मंत्री आणि अधिकारी असे सारे यात आहेत आणि सारे पुरावेही आहेत. या सार्या बाबी आयकर विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत. आयकर खात्याच्या कारवाईला राजकीय रंग देऊ नये, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
दोन प्रकारचे छापे आयकर विभागने टाकले आहेत. त्यामधील पहिल्या छाप्याच्या संदर्भात त्यांनी एक माध्यम पत्रक काढलं आहे. जी मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. मला तर असं वाटतं की माध्यमांना देखील कदाचित त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. कारण, १ हजार ५० कोटी रुपयांची दलाली कशाला म्हणतात? ही त्याच्यामध्ये कागदपत्र सापडले आहेत. त्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये बदल्या आहेत, यामध्ये टेंडर आहेत, यामध्ये मंत्री आहेत, अधिकारी आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात नव्हे देशातला सगळ्यात मोठा अशाप्रकारचा हा पुरावा या छाप्यांमध्ये सापडलेला आहे. आता एजन्सी त्या संदर्भात अधिक खुलासा करेल त्याचवेळी आपल्याला समजेल. त्यापेक्षा जास्त माहिती नाही. पण हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या सगळ्या छापेमारीनंतर पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरूप देणं हे चुकीचं आहे, असंही फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

