Share

एसटी महामंडळ खासगीकरणाचा घाट हाणून पाडणार – राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

कल्याण –”एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असेल तर सगळी माहिती मला आणून द्या. एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट हाणून पाडला जाईल”, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिका-यांना दिले आहे.”एसटी कामगारांनी त्यांच्या वेतनवाढीसाठी केलेल्या संपाच्या पश्चात सरकारने कामगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांची वेतनवाढ अद्याप कामगारांना मिळालेली नाही. त्याचबरोबर वेतनवाढीचा करारदेखील केलेला नाही. कामगारांना वेतनवाढ न देता एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे”,अशी व्यथा मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिका-यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडली.

रविवारी ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिका-यांसोबत ठाकरे यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला सरचिटणीस मोहन चावरे, कार्याध्यक्ष विकास आकलेकर, महादेव म्हस्के, राजू घरत, अमरावतीहून प्रदीप गायकी, सुदर्शन पझई, विनायक इंगोले, सुनिल इंगोले, बुलढाण्याहून राजेश इंगळे आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

मनसे राज्य परिवहन कामगार सेनेच्या पदाधिका-यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मांडली व्यथा .

एसटी कर्मचा-यांच्या वेतन वाढीचा करार 2012 साली झाली होती. त्याची मुदत 2016 साली संपुष्टात आली. मुदत संपुष्टात येऊन दोन वर्षे होत आहे. तरीदेखील वेतनवाढीचा करार केला जात नाही. हा करार मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या आठमुठे धोरणामुळे होत नाही . राज्यभरातील बस डेपोच्या स्वच्छतेसाठी एसटी महामंडळाने साडे चार हजार कोटी रुपये खर्चाचे कंत्राट दिले आहे. यापूर्वी कामगारांच्या गणवेशावर सात कोटी रुपये खर्च होत होता. आता हाच खर्च 73 कोटी रुपये दाखविण्यात येत आहे. शिवशाही बस प्रकल्पाच्या नावाखाली महामंडळाच्या ताफ्यात दीड हजार बसेस दाखल झालेल्या आहे. त्यापैकी 500 बसेस महामंडळाच्या आहेत. तर एक हजार बसेस या खाजगी कंत्रटदाराकडून पुरविण्यात आलेल्या आहे. ही सगळी प्रक्रिया महामंडळाचे खासगीकरण करण्याची आहे. ती थांबली पाहिजे. ज्या कंपन्यांना खासगी कंत्राट दिले आहे. त्या कंपन्या या परप्रांतातील आहेत. एसटी महामंडळास मराठी कंत्राटदारही मिळत नाही.

राज ठाकरे याचं आश्वासन

”एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असेल तर सगळी माहिती मला आणून द्या. एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा घाट हाणून पाडला जाईल’ त्याविषयी सरकारशी चर्चा करणार आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नावर सरकारचा समाचार गुढी पाडव्याच्या सभेत घेणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!